स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणाद्वारे देशभरातील तरुणांना एक भेट दिली आहे. देशातील तरुणांसाठी एक लाख कोटी रुपयांची योजना सुरू करत असल्याची घोषणा मोदी यांनी यावेळी केली. ‘पंतप्रधान विकसित भारत योजना’ या नावाची एक नवी योजना केंद्र सरकारने सुरू केल्याचं मोदी यांनी जाहीर केलं. या योजनेअंतर्गत तब्बल ३.५ कोटी तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या जातील, असं मोदी म्हणाले. तसेच खासगी क्षेत्रात पहिली नोकरी करणाऱ्या तरुण-तरुणींना सरकारकडून १५,००० रुपये दिले जातील, अशी घोषणा देखील मोदी यांनी यावेळी केली.