पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर भाषण करत असताना देशवासियांसाठी मोठी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार येत्या दिवलीत नागरिकांना एक मोठं गिफ्ट मिळणार असल्याचं सुद्धा मोदी म्हणालेत. म्हणाले की मागील आठ वर्षांत आम्ही सरकार म्हणून जीएसटी मध्ये रिफॉर्म केला आहे. आता देशभरातील कर कमी करण्याची वेळ आली आहे. आता काळाची ही मागणी आहे की पुढच्या पिढीसाठी जीएसटीची पुनर्रचना केली जावी. आम्ही यासाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. त्यांनी याबाबतचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. आम्ही आता नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म घेऊन येत आहोत, असं म्हणत मोदींनी देशवासियांना आनंदाची बातमी दिलीये..