भाजपासोबत येण्याची खूप आधीपासून आमची आणि मोठ्या साहेबांची देखील इच्छा होती. मात्र, गाडी स्लीप होऊन जात होती. 2014 च्या निवडणुकीत आम्ही काँग्रेसची आणि भाजपवाल्यांनी शिवसेनेची साथ सोडायची असं ठरलं होतं, असा मोठा गौप्यस्पोट
खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला. ते गोंदियात महायुतीच्या वतीने आयोजित सत्कार समारोप कार्यक्रमांमध्ये बोलत होते.