मुंबईत मागील दोन दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. शहर तसेच उपनगरात रविवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. काही भागात कमी वेळात अधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता देखील आहे.