मुंबईतील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. याचा फटका मुंबईची लाइफलाइन मानल्या जाणाऱ्या लोकलसेवेलाही बसला आहे. कुर्ला, चुनाभट्टी, चेंबूर परिसरात पाणी साचल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक १२ ते १५ मिनिटे उशिरा आहे. तसंच मध्य रेल्वे मार्गावरील गाड्या ५ ते ६ मिनिटं उशिराने धावत आहेत.