Ajit Pawar: चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकेवरील मोनोरेल गाडी मंगळवारी अचानक तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली आणि मोठ्या संख्येने प्रवासी गाडीत दीड ते दोन तास अडकले. या प्रवाशांना अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी खिडकीची काच तोडून सुखरूप क्रेनने बाहेर काढले आणि एक मोठी दुर्घटना टळली. या घटनेवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.