सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशना दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत १३०वं घटनादुरुस्ती विधेयक सादर केलं. मात्र या विधेयकाला विरोधकांकडून कडाडून विरोध करण्यात आला. दरम्यान, अमित शाह यावेळी बोलत असताना समाजवादी पक्षाचे खासदार धर्मेंद्र यादव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भातील एका विषयावरून भाजपाला टोला लगावला.