पुणे शहरातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समोरील उड्डाणपुलाचं उदघाटन बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी इलेक्ट्रिक वाहनातून एकत्र प्रवास केला. यावेळी अजित पवारांच्या हाती गाडीचं स्टेअरिंग होतं तर देवेंद्र फडणवीस बाजूला बसले होते.