Lonavala Women Fight: मुंबई पुणेच नव्हे तर राज्यभरातून पावसाळ्यात ज्या ठिकाणी सहलीसाठी लोक जमतात ते महाराष्ट्रातलं ठिकाण म्हणजे लोणावळा. मागील काही दिवसात पावसाच्या तीव्रतेबरोबर लोणावळ्यातील पर्यटकांची गर्दी सुद्धा वाढली होती. आणि याच गर्दीत काही महिलांची फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. जुना पुणे मुंबई महामार्गावर ए-1 चिक्की दुकानासमोर घडलेल्या या तमाशामुळे पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती पण नेमकं घडलं काय हे आता आपण पाहूया.