मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची यांची आज भेट झाली. या भेटीबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात होते. याबाबत आता स्वतः राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला आहे. शहराचं नियोजन आणि वाहतूक समस्येचा मुद्दा राज ठाकरेंनी फडणवीसांसमोर मांडला. यावर सरकारकडून दखल घेतली जाणार असल्याचंही राज ठाकरे म्हणाले.