Why did Sunetra Pawar Was Present At RSS Event at Kangana Ranaut’s House: अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला खासदार सुनेत्रा पवार या उपस्थित होत्या. यापूर्वी महायुतीचा भाग असूनही अजित पवार हे संघाच्या कार्यक्रमांमध्ये कधीही दिसून आले नाही मात्र त्यांच्या धर्मपती सुनेत्रा पवार आता संघाशी संबंधित कार्यक्रमात दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावरून स्वतः सुनेत्रा पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.