Nitesh Rane: सिंधुदुर्ग जिल्ह्यात खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर आता जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनीच थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. गुरुवारी संध्याकाळी त्यांनी कणकवली बाजारपेठेत सुरू असलेल्या एका मोठ्या मटका अड्ड्यावर स्वतः छापा टाकत अवैध धंद्यांचा पर्दाफाश केला. या छाप्यात पोलिसांनी मुख्य मटका बुकी महादेव रमाकांत घेवारी याच्यासह एकूण १२ जणांना ताब्यात घेतले असून, तब्बल रु. २ लाख ७८ हजार ७२५ रोख रक्कम, मोबाईल आणि लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.