पुण्यात आज एका डोळ्यांच्या दवाखान्याचं उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरून अजित पवारांनी केलेल्या विधानावरून एकच हशा पिकला. तर डाॅक्टरांनी आपल्या आई-वडिलांच्या केलेल्या सत्कारावरूनही अजित पवारांनी मिश्किल टोमणा मारला.