गेवराईमध्ये सोमवारी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांचे समर्थक आमने-सामने आले होते. यावेळी एकच गोंधळ निर्माण झाला होता. या संपूर्ण प्रकारानंतर पंडित यांचे समर्थक आक्रमक झाले असून त्यांनी लक्ष्मण हाकेंना इशारा दिला आहे.