ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजास आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला सोलापूर जिल्ह्यातूनही मोठा पाठिंबा मिळत आहे. अंतरवली सराटी येथून मुंबईकडे आंदोलनासाठी निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील हजारो मराठा बांधव वाहनांच्या ताफ्यासह मुंबईकडे रवाना झाले. यावेळी मुस्लिम बांधव आणि दलित बांधव यांनीही सक्रीय सहभाग नोंदवला