Eknath Shinde: गणेशोत्सवाच्या निमित्ताने राजकीय नेते हे एकमेकांच्या घरी सदिच्छा भेट देत असतात. मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी काल गणेश चतुर्थीच्या दिवशी उद्धव ठाकरे उपस्थित राहिले होते. या भेटीची चर्चा दिवसभर झाली. त्यानंतर आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरेंच्या दादरमधील निवासस्थानी भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. यानंतर बाहेर माध्यमांशी बोलत असताना त्यांनी सूचक विधान केले.