Maratha Reservation: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे शुक्रवारी सकाळी मुंबईत पोहोचले आहे. आझाद मैदानावर होणाऱ्या त्यांच्या आंदोलनाच्या काही तास आधी मुंबईत प्रवेश करताच समर्थकांनी त्यांचे वाशी येथे स्वागत केले. तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत