Maratha Reservation Manoj Jarange Patil Look A Like Gets Aggressive at CSMT: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आज मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू करणार आहेत. ते नुकतेच मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांना मर्यादित लोकांसह उपोषणाला परवानगी दिली आहे. असे असले तरी जरांगे पाटील यांच्याबरोबर मराठा समाजाचे लाखो लोक मुंबईत प्रवेश केला आहे. ऐन गणेशोत्सवाच्या कालावधीत एवढे लोक मुंबईत आल्याने त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी मुंबई पोलिसांची कसोटी लागणार आहे. आंदोलनाच्या दरम्यान मनोज जरांगेंसारखा हुबेहूब पेहराव करून एक व्यक्ती सहभागी झाली होती ज्यांनी आपली व्यथा मांडली आहे.