प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांचे कर्करोगाने निधन (लोकसत्ता टिम) मुंबई : मराठीसह हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. प्रिया मराठे यांनी वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला असून त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.