हजारोंच्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईत आले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीसह अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना आंदोलक पुन्हा मुंबईत का आले याचं उत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं देऊ शकतात, असं म्हटलं होतं. त्यावर आता एकनाथ शिंदे यांनी दरे गावातून प्रसार माध्यमांशी संवाद साधताना प्रत्युत्तर दिलं आहे. आरक्षण कोणामुळे गेलं? त्यांना राज ठाकरेंनी प्रश्न विचारायला हवे होते, असं शिंदे म्हणालेत.