बाॅम्बे रुग्णालयामध्ये कार्यरत असलेले डॉ. दिलीप निकम हे मराठा मोर्चामध्ये सेवा देत आहेत. दरम्यान अचानकपणे एक मोर्चेकरी बेशुद्ध झाल्याच कळताच डाॅक्टरांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीची पल्स लागत नसल्याचं लक्षात आल्यावर तत्परता दाखवून डाॅक्टरांनी CPR दिला आणि रुग्णाला शुद्धीवर आणलं. तसंच रुग्णाला तत्काळ ऍम्ब्युलन्समधून मोठ्या रुग्णालयात पाठवलं.