मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मागील तीन दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदान येथे मनोज जरांगे पाटील हे आंदोलनास बसले आहेत.त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो मराठा बांधव आझाद मैदानावर ठिय्या देऊन बसले आहेत. त्या सर्व आंदोलनकर्त्या बांधवाची गैरसोय होऊ नये, त्या पार्श्वभूमीवर मुस्लीम मावळा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी नगरसेवक अँड हाजी गफुर पठाण यांनी मोहमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त (स.) जेवण व्यवस्था केली आली असून त्याचं सर्व साहित्य मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आलं आहे. त्यावेळी ‘एक मराठा,लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. तर मराठा आंदोलकांच्या सेवेसाठी छत्रपती शिवरायांचा मुस्लीम मावळा अॅड हाजी गफूर पठाण मैदानात…! या आशयाचा मजकूर असलेला बॅनर सर्वांचंच लक्ष वेधून घेत होता.