राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी आझाद मैदानात मनोज जरांगेंची भेट घेतली. ही भेट घेऊ परतताना मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातला. तसंच शरद पवारांविरोधातही यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणावर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इतकं मोठं आंदोलन आहे, तरुण मुलांच्या मनात काही गोष्टी असतात. एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी नैतिक जबाबदारी आहे की मी त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. पुण्यात त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या.