laxman hake: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरणासाठी मुंबईत ५ दिवस केलेल्या आंदोलनाला यश मिळाले आहे. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर जरांगेंनी उपोषण सोडले. दरम्यान यानंतर ओबीसी समाजातून नाराजी व्यक्त केली जात आहे. ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी सरकारने काढलेला जीआरची होळी करण्याचं आवाहन ओबीसी बांधवांना केलं आहे.