Radhakrishna Vikhepatil: मनोज जरांगे यांच्या सगळ्या मागण्या सरकारनं मान्य केल्या. त्यानंतर जरांगेंनी उपोषण सोडलं. मराठा आंदोलनाला यश मिळाल्यानंतर रोहित पवार यांनी एक पोस्ट शेअर करुन जरांगेंचं अभिनंदन केलं. पण या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी सरकारवर काही आरोप केले.या आरोपांना आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.