जीएसटीच्या अमूलाग्र सुधारणा केल्या जातील अशा घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती. वस्तू आणि सेवा करांमध्ये जो बदल करायचा असतो तो जीएसटी परिषदेची त्यासाठी बैठक पार पडावी लागते. पण आधी घोषणा झाली मग बैठक पार पडली. हा जीएसटी २.० नाही, सुधारणाही नाही, भेटही नाही. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी जीएसटीच्या नव्या कर रचनेबाबत काय सांगितलं?