Prakash Ambedkar: मराठा समाजाला ‘ओबीसी’ प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांच्या उपोषणाची सांगता करण्यासाठी महायुती सरकारने काढलेला शासन निर्णय मराठासमाज, कुणबी समाज, न्या. शिंदे समिती, मंत्रिमंडळ उपसमिती या सर्वांची फसवणूक करणार आहे, असा आरोप ‘वंचित बहुजन आघाडी’चे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.