Sanjay Raut: सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे बेकायदेशीर उत्खननावर कारवाई करत असताना, एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून कारवाई थांबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. अजित पवार यांच्या फोन कॉलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. दरम्यान, महिला अधिकाऱ्याला केलेल्या या फोनवरून खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.