पुणे शहरातील नाना पेठेतील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून कौटुंबिक वादातून झाल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.तर या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश कोमकरचा मुलगा गोविंद ऊर्फ आयुष कोमकरचा ५ सप्टेंबर रोजी आंदेकर टोळीतील दोघांनी गोळ्या झाडून खून केल्याची घटना घडली. तर मुलावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गणेश कोमकर याने कोर्टाकडे पॅरोलसाठी अर्ज केला होता.तो अर्ज मंजूर होताच,गणेश कोमकर याला कारागृहाबाहेर काढण्यात आले आणि सोमवारी सायंकाळच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत आणण्यात आलं होतं. पोलिसांच्या गाडीमधून उतरताच गणेश कोमकरनं हातामध्ये असणारे एक कार्ड हात उंचावून सर्वांना दाखवलं. जे आयुषनं स्वतः कारागृहात वडिलांना पाठवलेलं होतं. “आय लव्ह यू पप्पा” असं त्या कार्डावर आयुषनं लिहिलं होतं. त्याचबरोबर “नवीन ड्रेस पाठवलाय” असे देखील लिहिले होते. या कार्डासोबत त्याने काही बालपणीचे फोटो चिकटवले होते.