गिरगाव चौपाटीवर रविवारी लालबागच्या राज्याच्या विसर्जन प्रक्रियेत प्रचंड दिरंगाई झाली होती. विसर्जनातील घोळामुळे गणपतीचं विसर्जन चंद्र ग्रहणात करावं लागलं. त्यामुळे लाखो भाविक संतप्त झालं आहेत. तसच, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा छळ झाल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीनं केला आहे. त्यामुळे विसर्जनातील खोळंबा व भक्तांचा करण्यात आलेला छळ याप्रकरणी मंडळातील कार्यकारी समितीतील सदस्यांची चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी समितीतर्फे करण्यात आली आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे.