Nanded: नांदेडच्या अर्धापूर येथील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील जेवणात चक्क अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांना वसतिगृहात सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी शासन लाखो रुपये खर्च करत असते. परंतु, अनेक ठिकाणच्या वसतिगृहात काही सुविधा मिळत नसल्याचा प्रकार समोर येत आहे. असाचं काहीसा प्रकार नांदेडच्या अर्धापूर येथील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात आढळून आला आहे. या विद्यार्थ्यांच्या जेवणात चक्क अळ्या निघाल्या.