महाराष्ट्राचे राज्यपाल व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांची देशाचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. संसदेमध्ये मंगळवारी झालेल्या मतदानामध्ये राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची ४५२ मतं मिळाली. विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीचे उमेदवार निवृत्त न्या. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मतं मिळाली. ‘इंडिया’ आघाडीची किमान १२ मतं फुटल्याचं मानलं जात आहे.