Pune: पुण्यातील जंगली महाराज रस्ता आता वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतो.पुण्याच्या मध्यवर्ती भागात अवघ्या २.५ किमींचा हा रस्ता जंगली महाराज मंदिरापासून ते डेक्कन जिमखाना परिसरापर्यंत जातो. पुण्यात जेएम रोड या नावाने तो जास्त परिचित आहे.या रस्त्याचे काम इतके दर्जेदार करण्यात आले की,देशभरात त्याचा आदर्श घेतला गेला.श्रीकांत शिरोळे यांनी लोकसत्तासोबत संवाद साधताना या रस्त्याविषयी माहिती दिली.