मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आग्रही आहेत. मात्र याला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र विरोध केला आहे. यासंदर्भातील उघड नाराजीही त्यांनी व्यक्त केली. तर आमचा मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं यासाठी विरोध नाही. त्यानुसार त्यांना १० टक्के आरक्षण मिळालेलं आहे, असं भुजबळ म्हणाले. त्यावर जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.