प्रभादेवी येथील १२५ वर्षांहून अधिक जूना पूल शुक्रवारी रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. तर पूल बंद केल्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) पुलाचे पाडकाम करत त्याजागी द्विस्तरीय पूल बांधला जाणार आहे. पाडकाम आणि नवीन द्विस्तरीय पुलाचे काम पूर्ण करत नवीन द्विस्तरीय पूल वाहतूक सेवेत दाखल करण्यासाठी किमान २० महिन्यांचा कालवाधी अपेक्षित आहे. त्यामुळे प्रभादेवी पूल बंद करताना या पुलावरुन जाणारी वाहतूक इतरत्र वळविण्यात आली असून वाहतूकीत अनेक बदल करण्यात आले आहेत.