उपमुख्यमंत्री अजित पवार हे पहाटेपासून पुण्यातील केशवनगर मुंढवा भागात पाहणी करत होते. यावेळी नागरिकांनी वेगवेगळ्या समस्या अजित पवारांसमोर मांडल्या. परिसरातील रस्त्यांची दुरावस्था आणि वाहतूक कोंडी याबाबत महिलेने तक्रार करताना गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं नाव घेतलं. पर्रीकर फिरायचे तसे कुणीतर
एकदा यायला हवं, असा सल्ला महिलेनं देताच अजित पवारांनी कोण पर्रीकर असा प्रश्न केला.