भारत-पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सामन्यावरून सध्या संपूर्ण देशात वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. काहींना सामन्याला समर्थन दिलं आहे तर काहींनी विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर पहलगाम हल्ल्यात आपला पती शुभम द्विवेदीला गमावेल्या ऐश्वर्याने प्रतिक्रिया दिली आहे. हा मॅचनंतर एकच दृश्य असेल ते म्हणजे पाकिस्तानकडे पुन्हा पैसा येईल. पैसा आली की दहशतवाद वाढवा हेच पाकिस्तानच काम आहे. जे या देशाबद्दल विचार करत नाहीत त्या भारतीय खेळाडू आणि बीसीसीआयकडून मला श्रद्धांजलीची अपेक्षा नाही, असंही ऐश्वर्या द्विवेदी म्हणाली.