प्रताप सरनाईक अचानक स्वारगेट स्थानकात पोहचले दरम्यान स्वारगेट बलात्कार प्रकरणात दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतरही त्यांची पुन्हा स्वारगेट आगारातच नेमणूक केली आहे. याबाबत समजल्यानंतर परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक संतापले. ‘आम्ही विधानसभेत उत्तरे देतो. अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यानंतर सुधारणा होईल. अशी अपेक्षा असते. पण, दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांची पुन्हा त्याठिकाणी नेमणूक कशी होते,’ अशी विचारणा करत सरनाईक यांनी एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.