राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाच्या आयोजित शिबिरात ओबीसी आरक्षणासंदर्भात
भाष्य केलं. याबद्दल ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी आव्हांडांचं कौतुक केलं आहे. जितेंद्र आव्हाड हे वाघाचा बच्चा आहेत. ओबीसी आरक्षणाचं तत्त्व त्यांनी सांगितलं तेव्हा शरद पवारांचे आमदार मान खाली घालून बसले होते, अशी टीकाही हाकेंनी केली.