Nashik Crime: शहरातील रस्ते, इमारत, घराबाहेरील प्रांगणात, कधी दुचाकीवर मार्गक्रमण करताना घडलेल्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून नेण्याच्या घटना आता थेट घरात येऊन पोहोचल्याचे रामवाडी येथील घटनेवरून दिसत आहे. श्रद्धा पार्क इमारतीत चोरांनी महिलेच्या घरात शिरून ४० हजार रुपयांची सोन्याची पोत खेचून नेली.