Devendra Fadnavis: भारतीय जनता पक्षाचा आज मुंबईत विजय संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार घणाघात केला. उद्धव ठाकरे यांची मागील दहा भाषणं काढा आणि त्यामध्ये विकासाबद्दलचं एक वाक्य दाखवा आणि माझ्याकडून १०० रुपये घेऊन जा असं म्हणत जोरदार टीका केली. तसेच २०१९ मध्ये घडलेल्या राजकीय घडामोडींचा दाखल देत अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, यार ने ही लूट लिया घर यार का, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.