Rohit Pawar: जामखेड येथे काल (१९ सप्टेंबर) आमदार रोहित पवार यांनी आमसभेचं आयोजन केलं होतं. या सभेत जामखेड येथील नागरिकांनी विविध समस्या आणि प्रश्न मांडले. नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांची अधिकारी उत्तरं देत होते. यावेळी एक अधिकारी नागरिकांच्या प्रश्नाचं उत्तर देत असतानाच त्या अधिकाऱ्याला रोहित पवार यांनी झापलं.