Narendra Modi: नवरात्रीचा उत्सव सुरु होतो आहे, त्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. देशात नवरात्रीचा उत्सव सुरु होत असतानाच नव्या बदलाना आपला देश सामोरा जातो आहे. जीएसटीमधल्या सुधारणा उद्याच्या पहिल्या किरणापासून सुरु होतो आहे. जीएसटी बचत उत्सव सुरु होतो आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी सोप्या पद्धतीने खरेदी करु शकणार आहात. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी यांचं देशाला संबोधन सुरु झालं आहे. यामध्ये नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाची घोषणा केली.