Sanjay Gaikwad: बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे वादग्रस्त विधाने करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते साधे बोलतच नाही,वादग्रस्तच बोलतात,त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तंबी दिली, पण ते सुधरायला तयार नाही, आता त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होणाऱ्या खर्चासंबंधी वादग्रस्त विधान केले आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता सहज आणि सोप्या राहिल्या नाही, काही ठिकाणी तर एक-दोन- तीन कोटी रुपये खर्च करावा लागतो, ऐव्हडेच नव्हे तर काही ठिकाणी १०० बोकड द्यावे लागतात, असं संजय गायकवाड म्हणाले. आता या वक्तव्यावरुन संजय गायकवाड यांच्यावर अनेकांनी टीका केली. विरोधकांच्या टीकेला आता संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
  
  
  
  






