Navnath Waghmare Car Viral Video: ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ गाडी जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जालना शहरातील निलमनगर भागात
रविवारी ही घटना घडली. अज्ञातानं या गाडीवर पेट्रोल टाकून गाडी जाळण्याचा प्रयत्न केला. यात गाडीचं प्रचंड नुकसान झालं आहे. दरम्यान, नवनाथ वाघमारे यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली. माझी गाडी जाळली हा जरांगे समर्थकांचा कट असून यापुढे जरांगेंच्या गाड्या जाळल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका, असा इशारा त्यांनी दिला. गाडी जाळल्याप्रकरणी मनोज जरांगे, शरद पवार, रोहित पवार, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी नवनाथ वाघमारे यांनी केली आहे.