Jitendra Awhad Brutally Slams Gopichand Padalkar Over Ugly Remarks On Jayant Patil: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबद्दल आणि त्याच्या वडिलांबद्दल अपशब्द वापरले होते. सोशल मीडियावर पडळकर यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चोहोबाजुंनी त्यांच्यावर टीकेची झोड उठली. जयंत पाटलांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचं दिसून आला. त्याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सांगलीत २२ सप्टेंबरला संस्कृती बचाव मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात सहभागी झालेल्या आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकरांना पुन्हा इशारा दिला आहे.