MP Omraje Nimbalkar Rescues People Stuck In Rain Flood: धाराशिवच्या परंडा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वडनेर गावात आलेल्या पुराच्या पाण्यात मध्यरात्रीपासून एकाच कुटुंबातील चार जण हे याच पुरात अडकले होते. आता अखेरीस यातील वृद्ध महिलेसह चौघांना वाचवण्यात यश आले. विशेष म्हणजे, या बचावकार्यात उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः एनडीआरएफच्या जवानांसोबत सहभागी होऊन या कुटुंबाला सुरक्षित स्थळी आणले.