धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाचे वेध लागल्याचं बोललं जात आहे. कारण कर्जतमधील एका कार्यक्रमात मुंडे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोरच मोठी मागणी केली आहे. धनंजय मुंडे म्हणाले, “मला रिकामं ठेवू नका. एखादी जबाबदारी द्या.” धनंजय मुंडे यांच्या या मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.