कधीकाळी कट्टर शिवसैनिक असणारे कोकणातील नेते राजन तेली भाजपा, ठाकरे गट असा प्रवास करत शिंदे गटात दाखल झाले आहेत.
दसरा मेळाव्यात राजकीय सीमोल्लंघन करत त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. राजन तेलींच्या या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे कोकणातील राजकीय समीकरणं आगामी काळात बदलण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर राजन तेलींनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानं सिंधुदुर्गात विविध चर्चांना उधाण आलं आहे.