MLA Wife Was Orderes By Govt Employee Husband Not to Use Photos Together: छत्रपती संभाजी नगरच्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनुराधा चव्हाण यांना त्यांच्या पतीकडून एक पत्र देण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात मुख्य अभियंता असलेले अतुल चव्हाण यांनी पत्र करून त्यांना एक विनंती केली आहे. माझा फोटो वापरू नका, असं तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना सांगा अशी विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. मी शासकीय नोकरीवर असल्याने या बॅनरबाजी मुळे माझ्या कार्यक्षमतेवर व शासकीय पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे माझ्या विरोधात तक्रारी देखील येत आहे. त्यामुळे हे मला त्रासदायक वाटत असून तुमच्या कार्यकर्त्यांना मर्यादा घालावी. अशी विनंती आमदार अनुराधा चव्हाण यांना त्यांचे पती अतुल चव्हाण यांनी केली आहे.